गौरीच्या साज शृंगाराने बाजारपेठ सजली

पिंपरी – अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गौरी-गणेशोत्सवासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठा गौरीचे मुखवटे व शृंगार साहित्याने सजल्या आहेत. यावर्षी बाजारात नवनवीन प्रकारातील गौरीचे मुखवटे बाजारात उपलब्ध असून खरेदीसाठी महिलांची गर्दी होवू लागली आहे. मुखवटे व मूर्तीच्या दरात यंदा कोणतीही वाढ झाली नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

गणेशोत्सवासाठी अवघ्या आठ दिवसांचा अवधी उरला आहे. गणरायापाठोपाठ गौरीचेही आगमन होते. त्यामुळे बाजारपेठेत गौरीच्या मुखवट्यासह सजावट साहित्यांची रेलचेल आहे. यंदा विठ्ठलगौरी, सोनचाफा, कोल्हापुरी, नाथनी, म्हाळसा, लहान दागिना, मोठा दागिना, झुबाडोरा, वज्रटीक, नेकलेस, जम्बो मुखवटा असे गौरीच्या मुखवट्याचे नवीन प्रकार बाजारात आले आहेत.

फायबरची अखंड गौरी किंवा अर्धाकार गौरी, फक्त मुखवटा अशा प्रकारे गौरीचे मुखवटे बाजारात मिळत आहेत. गौरीचे मुखवटे गुलाबी रंग, त्वचा गोरा रंग, पिवळा रंग या प्रकारात आहेत. फायबरच्या 3 फुट उंचीच्या गौरीसाठी 10 हजार, 4 फुटासाठी 12 हजार, 5 फुटासाठी 14 हजार, तर अर्धाकार गौरी मुखवट्यांच्या किंमती 4 हजारापासून ते 8 हजारापर्यंत आहेत. “पीओपी’च्या गौरीच्या किंमती बाराशेपासून ते 3600 पर्यंत आहेत.

गेल्या वर्षी गुढीपाडव्यापासून महाराष्ट्र शासनाने प्लॅस्टिक बंदी केल्यामुळे सर्वच व्यावसायिकांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागला होता. त्याचप्रकारे गौरी मुखवटे विक्रेत्यांना सुद्धा ग्राहकांना मुखवटे बांधून देते वेळेस कसरत करावी लागत आहे. प्लॅस्टिक ऐवजी आता विक्रेत्यांना कागदात मूर्ती बांधून द्याव्या लागत आहेत.
– अजय म्हात्रे, विक्रेता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)