गौराईच्या आगमनाने भाज्यांचे दर वाढले

पिंपरी– गणपती, गौरी यांचे आगमन झाल्यामुळे बाजारात भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. तसेच भाजीपाल्याच्या आवकेसोबत त्यांच्या भावातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पिंपरी येथील लाल बाहदूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी 14 ट्रक दाखल झाले. यामध्ये भाजीपाल्याची आवक 46 क्विंटलने वाढली आहे. गेल्या तीन आठवड्यापासून कांद्याची आवक घटली होती. मात्र, यावेळेस कांद्याची आवक 26 क्विंटलने वाढली असून भावही 100 रूपयांनी वधारले आहेत. भेंडीची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत 5 क्विटलने वाढली आहे. परंतु, गौरी आगमनामुळे भाव ही 500 रूपयांने वाढले आहेत. गवारीची आवक स्थिर असून भावात 500 रूपयांनी वाढ झाली आहे. टोमॅटोची आवक एक क्विंटलने घटली आहे. त्याचे भाव पन्नास रूपयांनी वाढले आहेत. घेवड्याची आवक एक क्विटलने घटली असून भाव 250 रूपयांनी वधारले आहेत.

गेल्या काही महिन्यापासून दोडक्‍याची आवक घटली होती. या आठवड्यात मात्र आवक चार क्विटलने वाढली असून दोडक्‍याचे भाव 500 रूपयांनी वधारले आहेत. मिरचीची आवक एक क्विंटलने घटली आहे आणि भाव 250 रूपयांनी वधारले आहेत. तसेच दुधी-भोपळ्याची आवक एक क्विंटलने वाढली असून त्याचेही भाव 150 रूपयांनी वधारले आहे. गेल्या आठवड्यात काकडीची आवक वाढली होती मात्र, यावेळी काकडीची आवक 6 क्विंटलने घटली आहे. काकडीच्या भावातही 200 रूपयांनी वाढ झाली आहे. कारल्याची आवक सहा क्विंटल झाली असून बाजारभाव स्थिर आहेत. फ्लॉवरची आवक एक क्विंटलने वाढली असून भाव मात्र 500 रूपयांनी घसरले आहेत. कोबीची आवक सहा क्विंटल झाली असून भाव स्थिर आहेत. ढोबळी मिरचीची आवक एक क्विंटल झाली असून भाव ही स्थिर आहेत.
पालेभाज्यांमध्ये पालकची आवक घटली असून भाव घसरले आहेत. कोथिंबीर 3000 जुड्या, मेथी 2400, शेपू 2400, पालक 1800 जुड्यांची आवक झाली आहे. तसेच मक्‍याच्या कणसाची आवक 7 क्विंटल झाली असून भाव स्थिर आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)