गौरव खेळाडूंचा : पुण्याच्या रोहन मोरेला राष्ट्रपतींच्या हस्ते नॉर्गे पुरस्कार प्रदान

पुणे – मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसानिमित दरवर्षी 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. राष्ट्रपती भवनात या दिवशी देशातील खेळातील पुरस्कारांचे वाटप राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात येते. आज राष्ट्रपतांच्या हस्ते वेगवेगळ्या पुरस्कारांनी खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. यामध्ये साहसी क्षेत्रासाठी दिला जाणारा तेनजिंग नॉर्गे पुरस्काराने पुण्याचा स्विमर रोहन मोरेला सन्मानित करण्यात आले. हा सोहळा राष्ट्रपती भवन येथे पार पडला.

वेगवेगळ्या कॅटेगिरीत दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारात पाण्यातील साहस प्रकारासाठी रोहन मोरेला हा पुरस्कार देण्यात आला आहे. रोहनने आजपर्यंत अनेक समुद्री खाड्या पार केल्या आहेत. जपानची त्सगारू चॅनेलची तब्बल 32 किलोमीटरची खाडी रोहनने 10 तास 37 मिनिटात पार करण्याचा पर्कर्म केला आहे. असे अनेक पराक्रम रोहनच्या नाववर आहेत. त्याच्या या पराक्रमात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)