‘गौरक्षणाची भाषा करायची आणि जनावरं पाहुण्यांकडे पाठवा म्हणायचे, हे दुर्भाग्य पूर्ण’

मुंबई: अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी संतापजनक वक्तव्य केले आहे. चारा छावण्यांबाबत त्यांना प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना त्यांनी छावण्या नसतील तर जनावरं द्या पाहुण्यांकडे सोडा, असे वक्तव्य केले होते. याचा विरोधकांकडून चांगलाच समाचार घेण्यात आला. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे म्हणाले, दुष्काळात जनतेला धीर देऊन मदत करण्याऐवजी “चारा नसेल तर जनावरं पाहुण्यांकडे किंवा शेजारी पाठवा” असे वक्तव्य जर राम शिंदे यांच्यासारखे मंत्री करत असतील तर खरंच हे दुर्भाग्यपूर्ण आहे आणि या सरकारची जनतेप्रति किती संवेदना आहे हे आणि शेतकरी विरोधी माणसिकता लक्षात येते. एकीकडे गौरक्षणाची भाषा करायची आणि दुसरीकडे जनावरं शेजाऱ्याकडे पाठवा म्हणायचे, हे दुर्भाग्य पूर्ण आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)