गौतम पब्लिक स्कूलमध्ये राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेस प्रारंभ

कोळपेवाडी – “गौतम पब्लिक स्कूल राज्यस्तरीय स्पर्धा भरविणारी पहिली शाळा असून, आयुष्याला पुरणारी शिदोरी गौतम पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना मिळत असल्यामुळे मी व माझ्यासारखे या शाळेचे अनेक माजी खेळाडू विविध शासकीय सेवेत उच्च पदावर जबाबदारी सांभाळत आहे. खेळाडूंसाठी सर्व शासकीय नोक-यांमध्ये राखीव कोटा असून, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक कमविण्यास मोठा वाव असला तरी खेळाबरोबर चांगला अभ्यास करा व आपले आयुष्य हसत-खेळत घडवा,’ असा संदेश स्पर्धेचे उद्‌घाटक व गौतम पब्लिक स्कूलचे माजी हॉकीपटू बाळासाहेब जगझाप यांनी दिला.

गौतम पब्लिक स्कूल माजी विद्यार्थी संघटना व गौतम पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने 31 जाने. ते 1 फेब्रु.दरम्यान गौतम पब्लिक स्कूलच्या मैदानावर राष्ट्रीय हॉकी खेळाडू कै. रवींद्र साहेबराव पाटील यांच्या स्मरणार्थ 17 वर्षांखालील मुलांच्या भव्य राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेस शानदार प्रारंभ झाला; यावेळी जगझाप बोलत होते.
याप्रसंगी संस्थेचे संचालक कै. रवींद्र पाटील यांचे कुटुंबीय, माजी विद्यार्थी व माजी हॉकीपटू विजय जाधव, बाळासाहेब वक्ते, नाना नवले, अजय कुलकर्णी, विलास खोंड, गोरख जाधव, वाल्मिक भिंगारे, अण्णासाहेब काळे, रामराव साळुंके, श्‍यामराव जाधव, गौतम पवार, विजय रोहम, चांगदेवराव आगवन, सीताराम राहणे, विठ्ठल सोनवणे, शाळेचे प्राचार्य नूर शेख, आदी उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)