गौतम गंभीर दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा कर्णधार

बंगळुरु : आयपीएलच्या अकराव्या मोसमात गौतम गंभीरची घरवापसी म्हणजेच दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये पुनरागमन झाले आहे. गंभीर दिल्ली संघाचा कर्णधार असेल, असे स्पष्ट संकेत मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी त्याचे पुनरागमन होताच दिले आहेत.
गौतम गंभीरने आयपीएलमध्ये यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व केले होते. त्याच्याच नेतृत्वात केकेआरने दोन वेळा आयपीएल चॅम्पियन होण्याचा मानही मिळवला आहे. मात्र यावेळी केकेआरने त्याला रिटेन केले नाही. यंदाच्या आयपीएल लिलावात गंभीरची बेस प्राईस 2 कोटी रुपये होती. त्याच्यावर बोली लावत दिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याला 2.8 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. दिल्लीच्या संघात पुनरागमन होताच गंभीरने आनंद व्यक्त केला आहे. आयपीएलच्या पहिल्या तीन मोसमांमध्ये गंभीरने दिल्ली संघाचं प्रतिनिधित्व केले होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)