गौतम गंभीरने अखेर का लावली टिकली ?

क्रिकेटर गौतम गंभीर नेहमीच देश आणि समाजाबद्दलचे आपले विचार सोशल मीडियाद्वारे परखडपणे मांडत असतो. समकालीन मुद्यांवरील गंभीरचे विचार सातत्याने सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या फोटोमध्ये गौतम गंभीरने कपाळावर टिकली आणि डोक्यावर ओढणी घेतल्याचे दिसून येत आहे. हा फोटो पाहून सर्वच जण आश्चर्यचकित होत आहे. परंतु, त्यामागील कारण कळल्यावर त्याची तितकीच प्रशंसाही होत आहे.

गौतम गंभीरने ‘हिजडा हब्बा’च्या उदघाटन सोहळ्यास उपस्थिती लावली होती. यावेळी त्याने ट्रान्सजेंडरसोबत समानतेची भावना दर्शवण्यासाठी त्यांच्यासारखीच वेशभूषा परिधान केली होती. याच वेशभूषेतील फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनला आहे.

गौतम गंभीरच्या मते, ट्रान्सजेंडर समाजातील लोकांना अनेकदा समाजातील भेदभावाला सामोरे जावे लागते. बऱ्याच वेळा हिंसेलाही तोंड द्यावे लागते. अशा लोकांना आपल्यापेक्षा वेगळे समजण्याआधी एक लक्षात ठेवायला पाहिजे जी, तीही माणसेच आहेत.

दरम्यान, याआधीही गौतम गंभीरने रक्षाबंधनानिमित्त एका ट्रान्सजेंडरकडून राखी बांधली होती. याचेही सोशल मीडियावर कौतूक झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
54 :thumbsup:
35 :heart:
11 :joy:
17 :heart_eyes:
14 :blush:
9 :cry:
11 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)