गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या पाच ट्रकवर कारवाई

तहसिलदार कळसकर यांनी ठोठावला साडेपाच लाखांचा दंड
महाबळेश्वर, दि. 9 (प्रतिनिधी) – वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून गौण खनिजाचे वाहतूक करणाऱ्या पाच ट्रकवर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तहसिलदार मिनल कळसकर यांनी सापळा लावून कारवाई केली. दरम्यान, संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यावेळी पाच ट्रक मालकांना पाच लाख 65 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला.
मंगळवारी महाबळेश्वरच्या तहसिलदार या वाई येथे शासकिय बैठकीसाठी गेल्या होत्या. तेथून रात्री परत येत असताना त्यांना चिपळून येथून नऊ ट्रक दगड भरून महाबळेश्वरमार्गे पुढे जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे एक लिपिक व एक शिपाई असे दोन कर्मचारी बोलावून घेऊन मध्यरात्री बारा वाजता महाड नाका येथे पोलिसांच्या मदतीने तहसीलदार कळसकर यांनी सापळा लावला. दीड वाजण्याच्या सुमारास एका पाठोपाठ एक ट्रक येवु लागले. साधरण अर्ध्या तासात पाच ट्रक आले, सापळा लावल्यामुळे हे पाचही ट्रक पकडण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)