गो कार्टिंगमध्ये “जयहिंद’चा “मेक चिता’ अव्वल

  • हैद्राबाद येथील रेसिंग ट्रॅकवर रंगल्या स्पर्धा

नारायणगाव – हैद्राबाद येथील हस्तन गो कार्टिंग रेसिंग ट्रॅक येथे नॅशनल सुपर कार्टिंगतर्फे आयोजित स्पर्धेत कुरण येथील जयहिंद अभियांत्रिकीच्या “मेक चिता’ संघाला प्रथम पारितोषिक मिळाले, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डी.एस.गल्हे यांनी दिली.
या स्पर्धेसाठी देशातील महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू, मध्यप्रदेश यांसह विविध राज्यांमधील एकूण 42 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत जयहिंद महाविद्यालयाच्या “मेक चिता’ या संघाला “ऑटोक्रॉस’मध्ये 15 हजार, स्किडपॅडमध्ये 7 हजार 500 अशी प्रथम क्रमाकांची पारितोषिक व अजिंक्‍य शिंदे याला बेस्ट रायडरचे 10 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक संघाला मिळाली. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी होंडा शाईनचे 125 सी सी इंजिन वापरून कार्यशाळेमध्ये आवश्‍यक जोडणी करून रेसिंग कार तयार केली होती. ही कार तयार करण्यासाठी एक महिना विद्यार्थ्यांना कष्ट घेतले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात एकूण पाच गो कार्ट तयार केल्या होत्या, त्यामध्ये “मेक चिता’ संघाची कार्ट ही सर्व स्तरावर उत्कृष्ट ठरलेली आहे. त्यासाठी त्यांना महाविद्यालयाच्या वर्कशॉप शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मदत केली. टाकाऊ साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी या कारला आकार दिला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे महाविद्यालयाचे प्रा. जी. एन. कदम यांना बेस्ट फॅक्‍ल्टीसाठी सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांना मार्गदर्शन व सहकार्य करणाऱ्या शिक्षक व वर्कशॉपमधील सर्व कर्मचाऱ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब गुंजाळ, सचिव विजय गुंजाळ, संचालक एन. एम. काळे, संचालिका शुभांगी गुंजाळ, प्राचार्य डॉ. डी. जे. गरकल, मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख प्रा. आर. एल. मानकर यांनी अभिनंदन केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)