गोसीखुर्द उजवा कालव्यासाठी उपसा सिंचन पद्धत राबविणार – विजय शिवतारे

मुंबई – ब्रम्हपुरी तालुक्यातील 28 हजार 875 हेक्टर लागवडीखाली असलेल्या जमिनीसाठी ठिबक सिंचनाचा वापर केल्यास उर्वरित पाणी वितरित करण्यात येऊ शकते. अथवा गोसीखुर्द उजवा कालव्यासंदर्भात तांत्रिक बाबी तपासून नियमाप्रमाणे उपसा सिंचन योजना राबविल्यास पाणी उपलब्ध होऊ शकते अशी माहिती जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज दिली.

यासंदर्भात सदस्य विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना शिवतारे म्हणाले, गोसीखुर्द उजवा कालवा ९९ कि.मी.चा असून ११.२५ टीएमसी पाण्याचे वाटप करण्यात आले आहे. कालव्याच्या ऊर्ध्व भागातून ज्यांच्या जमिनी आहेत. त्या क्षेत्रातील बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी, कालव्याचे दहा समभाग करता येऊ शकतात. क्षेत्राच्या १० टक्के मर्यादित उपलब्ध क्षमतेवर उचल परवानगी देऊन उपसा सिंचन योजना राबविता येऊ शकते, अशी माहिती  शिवतारे यांनी यावेळी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)