गोष्टीतून मुलांना व्यक्तीमत्व विकासाचे धडे

पालिका शाळेतील मुलांसाठी उपक्रम

पुणे   : महापालिका शाळांमधील मुलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी तसेच शनिवारच्या दिवशी शाळांमधील मुलांची उपस्थिती वाढावी या उद्देशाने आयडेंटीटी फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने कोरेगाव पार्क येथील कस्तुरबा गांधी शाळा क्रमांक 49 बी मध्ये गोष्टीरंग या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमा अंतर्गत संतोष गायकवाड यांनी मुलांना गोष्टीतून व्यक्तिमत्व विकासाचे धडे दिले.

1ली ते 7 वी मधील सुमारे 100 हून अधिक मुले या उपक्रमात सहभागी झाली होती. शाळेचे मुख्याध्यापक चांगदेव बिचकुले, संस्थेच्या विश्‍वस्त संगीता शिंदे, या उपक्रमाचे प्रमुख पाहूणे टीयेटोचे अभिजीत बेंडगिरी, संस्थेच्या शिक्षीका योगीता पगारे, सविता गोंधळे, निशा शिंदे, निता भांडवलकर, राजेंद्र कोळी , विष्णू सोनावणे  यावेळी उपस्थित होते. यावेळी मुलांनी नवीन वर्षाची भेटपत्र तयार करून ती उपस्थित मान्यवरांना देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
48 :thumbsup:
26 :heart:
12 :joy:
4 :heart_eyes:
5 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)