गोशाळेस चारा खरेदीसाठी मदत

पिंपरी – चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम शैक्षणिक प्रकल्पातील गोशाळेस कांतीलाल नेनुरामजी ओझा यांच्या पुण्यस्मरणार्थ चारा खरेदीसाठी मदतीचा धनादेश देण्यात आला.

परतीच्या पावसाने ओढ दिल्याने त्याचा परिणाम जनावरांच्या चाऱ्यावर झाला आहे. मागील तीन महिन्यांची गोशाळेला चारा मिळणे अवघड झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर पुनरुत्थान समरसता गुरुकुलमकडून शहरातील सामाजिक संस्थांना याबाबतचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार ही मदत करण्यात आली आहे.

-Ads-

या गोशाळेत 80 देशी गाईंचे संगोपन केले जात आहे. त्यांना दररोज साडे तीन हजार रुपयांचा एक हजार किलोचा चारा लागतो. समाजातील दानशूर समाज बांधवांनी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष गिरिष प्रभुणे यांच्याशी 9766325082 या क्रमांकावर अथवा हेमराज चौधरी यांच्याशी 9028306685 या क्रमांकावर संपर्क साधावा.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)