गोव्यात शहरीकरण झालेल्या गावांमधील मद्य दुकानांना दिलासा मिळणार

पणजी – गोव्यात बारमालक तसेच मद्यविक्री करणाऱ्या दुकानमालकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून, शहरीकरण झालेल्या गावांमधून जाणाऱ्या महामार्गालगतची सध्या बंद असलेल्या 1332 मद्य आस्थापनांपैकी निम्मी आस्थापने पूर्ववत खुली करण्यासाठी लवकरच हिरवा कंदिल मिळण्याची शक्यता आहे. गावांमधून जाणाऱ्या हायवेलगतच्या बंद असलेल्या मद्य आस्थापनांच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी पालिकामंत्री फ्रान्सिस डिसोझा, महसूलमंत्री रोहन खंवटे, नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई या तीन मंत्र्यांची समिती स्थापन केलेली आहे.

या समितीची पहिली बैठक दोन दिवसांपूर्वी झाली. त्यानंतर वेगाने हालचाली झाल्या असून शहरांपासून जवळ असलेले गाव ज्यांचे शहरीकरण झालेले आहे, अशा गावांमधील बार खुले करण्याची परवानगी सरकारकडून दिली जाण्याचे संकेत मिळत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने विकसित पंचायत क्षेत्रांमधील हायवेलगतच्या मद्य आस्थापनांना निवाड्याव्दारे दिलासा दिलेला आहे. विकसित पंचायत क्षेत्रांमधील हायवेलगतच्या मद्य आस्थापनांबाबत राज्य सरकारने काय तो निर्णय घ्यावा,असं सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे त्यामुळे बारचे  मालक तसेच मद्यविक्री करणाऱ्या दुकानदारांना दिलासा मिळणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)