गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करा-कॉंग्रेसची मागणी

मुख्यमंत्री आणि दोन मंत्र्यांच्या अनुपस्थितीची पार्श्‍वभूमी
पणजी – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि दोन मंत्री वैद्यकीय उपचारासाठी राज्याबाहेर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीचे कारण पुढे करून कॉंग्रेसने गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

प्रकृतिविषयक कारणांवरून 62 वर्षीय पर्रीकर सातत्याने गोव्याबाहेर आहेत. पांडुरंग मडकईकर आणि फ्रान्सिस डिसुझा हे मंत्रीही आजारपणामुळे राज्यात उपस्थित नाहीत. त्यामुळे राज्यापुढे घटनात्मक पेच उद्भवला आहे. मुख्यमंत्र्यांची तात्पुरती अनुपस्थिती ग्राह्य धरली जाऊ शकते. मात्र, 24 तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी मुख्यमंत्री अनुपस्थित राहणार असतील तर त्यांनी इतर कुणाकडे तरी कार्यभार सोपवायला हवा. पण, पर्रीकर यांनी तसे केलेले नाही.

राज्याप्रती असलेले कर्तव्य निभावण्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि इतर दोन मंत्र्यांनी घेतलेल्या शपथेचा भंग झाला आहे. राज्यात सरकार अस्तित्वात नाही. त्यामुळे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते रमाकांत खलप यांनी केली. ही मागणी मांडण्यासाठी कॉंग्रेसचे नेते राज्यपाल मृदूला सिन्हा यांची भेट घेणार आहेत.

वैद्यकीय उपचारांसाठी पर्रीकर चालू वर्षी मार्च ते जून या कालावधीत अमेरिकेत होते. ते ऑगस्टमध्ये काही दिवसांसाठी पुन्हा अमेरिकेला गेले. नंतर त्यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मागील आठवड्यात ते पुन्हा अमेरिकेला गेले आहेत. डिसूझा हेही उपचारासाठी मागील महिन्यात अमेरिकेला गेले आहेत. तर मडकईकर यांच्यावर जूनपासून मुंबईतील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)