गोव्यात प्रियकरासमोरच तरुणीवर सामूहिक बलात्कार

पणजी : गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर एका तरुणीवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीच्या प्रियकरासमोरच हे कृत्य केले. दक्षिण गोवा येथील एका समुद्र किनाऱ्यावर प्रेमी युगूल संध्याकाळी गप्पा मारत बसले होते. यादरम्यान तीन तरुण तिथे पोहोचले. त्या तिघांनी त्या युगूलाला हटकले. यानंतर त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. तिघांनी त्या युगूलाला मारहाण केली, तसेच त्यांना विवस्त्र करुन त्यांचे छायाचित्र देखील काढले. यानंतर त्या तिघांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला.

पोलीस अधीक्षक अरविंद गवस यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. आम्ही या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पीडित तरुणीची वैद्यकीय चाचणी झाली आहे. नराधमांचा शोध सुरु असून संशयितांची चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)