गोव्यात घटनेतील तरतुदीनुसार सरकारच अस्तित्वात नाही-काँग्रेस आमदार

पणजी : गोव्यात घटनेतील तरतुदीनुसार सरकारच अस्तित्वात नाही, अशा प्रकारची तक्रार काँग्रेसचे आमदार व प्रदेश काँग्रेस समिती यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली. घटनात्मक पेचप्रसंगातून गोवा राज्य जात असून राज्यपालांनी यात हस्तक्षेप करावा अशी मागणी काँग्रेसने केली. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या आरोग्याच्या स्थितीबाबत सरकारकडून रोज अधिकृत माहिती जारी केली जावी, अशी मागणी काँग्रेसने केली.

गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अॅड. शांताराम नाईक यांच्यासह काँग्रेसचे पाच पदाधिकारी व विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार सोमवारी  सकाळी राज्यपालांना भेटले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे बरेच दिवस अमेरिकेतील इस्पितळात उपचार घेत आहेत. ते किती काळ तिथे असतील याची कुणाला कल्पना नाही. आम्ही त्यांना सहकार्य करत विधानसभेचे महिन्याभराचे अर्थसंकल्पीय अधिवेशन केवळ तीन दिवसांवर आणण्यासाठी मान्यता दिली होती, असे काँग्रेसने राज्यपालांना सांगितले.

-Ads-

आता पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत सरकारच चालत नाही, प्रशासन ठप्प झाले आहे, तीन मंत्र्यांची जी समिती नेमली गेली आहे, त्या समितीला कसले घटनात्मक अधिकार आहेत असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याच्या माहितीबाबत सरकार लपवाछपवीच करत आहे. राज्यात घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला आहे. अशावेळी तातडीने तुम्ही गोवा विधानसभेचे अधिवेशन बोलवावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर व इतरांनी राज्यपालांकडे केली.

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)