पणजी : गोव्यात आंब्याचा हंगाम सुरू झाला असून स्थानिक आंब्याबरोबरच शेजारील राज्यातून आंबे गोव्याच्या बाजारपेठेत दाखल होऊ लागले आहे. हे आंबे कृत्रिमरित्या पिकवले जात असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाने मडगावात कारवाई करताना अशा पद्धतीने पिकविण्यात आलेले 220 किलो आंबे जप्त करून त्यांची विल्हेवाट लावली.
कृत्रिमरित्या आंबे पिकविल्यास कारवाई केली जाणार असल्याचा इशारा यापूर्वीच एफडीएने व्यापाऱयांना दिला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून आरोग्याला घातक असलेल्या रसायनाचा (इथोपॉन) वापर करून कृत्रिमरित्या आंबे पिकविण्याचे प्रकार सुरू झाल्याने, त्याची गंभीर दखल घेत काल एफडीएने मडगावात या वर्षाची पहिली कारवाई करताना तब्बल 220 किलो आल्फोन्सो आंबे जप्त केले.
ही कारवाई शिरवडे-नावेली येथील अली नागराज, शॉप क्र. जी1, रझा इन्क्लेव बिल्डिंगमध्ये करण्यात आली. या आल्फोन्सो आंब्याची किंमत 37 हजार रूपये होत असल्याची माहिती एफडीएने दिली. नंतर या आंब्याची विल्हेवाट सोनसोडय़ावर लावण्यात आली
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा