गोव्यातून भाड्याने आणलेली गाडी विकण्याचा प्रयत्न :परप्रांतीय जेरबंद

 खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांची कारवाई

पुणे – गोवा येथून ऑडी कार भाड्याने घेऊन पुण्यात विकण्यचा प्रयत्न करणाऱ्याला उत्तरप्रदेश येथील व्यक्तीला खंडणी विरोधी पथकाने 24 तासात जेरबंद केले. अशिष विजय डे (वय 35) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याला गोवा पोलिसांच्या ताब्यत देण्यात आले आहे.
पोलीस उपनिरीक्षक कर्मचाऱ्यांसह गुरूवारी चेन स्नेचिंग होऊ नये, यासाठी गस्त घालत होते. त्यावेळी बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत न्यू पुना क्‍लब रस्त्यावर संशयितपणे ऑडी गाडी फिरताना त्यांना दिसली. त्यावेळी ही गाडी अडविण्यात आली. चालक डे याच्याकडे गाडीच्या कागदपत्रे मागण्यात आली. त्यावेळी गोवा येथील बागा, कलंगुट येथून फसवणूकीने भाडे तत्त्वावर ही गाडी आणली होती. पुणे अथवा मुंबई येथे ही गाडी विकणार असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडील 42 लाख रुपये किंमतीची गाडी जप्त केली. गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे, पोलीस कर्मचारी भाऊसाहेब कोंढरे, प्रमोद मगर, रमेश गरूड आणि नारायण बनकर यांनी ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)