गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर पुन्हा रूग्णालयात दाखल

पणजी – माजी केंद्रीय मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना गुरुवारी संध्याकाळी कलंगुट येथील एका खासगी रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आले. ही माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत कोणताही अधिक तपशील देण्यात आलेला नाही.

विधानसभेचे उपाध्यक्ष आणि भाजपा आमदार मायकल लोबो यांनी रुग्णालयात जाऊन पर्रिकर यांची भेट घेतली. पर्रिकर यांची प्रकृती ठीक असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे सप्टेंबर महिन्यातच अमेरिकेतून उपचार घेऊन परतले होते. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ते उपचारासाठी अमेरिकेला गेले होते. या वर्षाच्या सुरुवातीलाच सुमारे तीन महिने अमेरिकेत त्यांच्यावर उपचार सुरु होते. सप्टेंबर महिन्यातच ते जेव्हा अमेरिकेहून परतले तेव्हापासून ते सराकारी बैठकीत सहभागी झाले नव्हते. घरातूनच ते काही फाइल्स पास करत होते अशीही माहिती समोर आली आहे. आता त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा एकदा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)