गोव्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांचा राजीनामा

पणजी : काँग्रेसमध्ये नेतृत्व करण्यासाठी तरूणांनी पुढे यावे तसेच, ज्येष्ठांनीही त्यांना संधी द्यावी, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या दिल्ली येथील अधिवेशनात केले होते. या भाषणाचा परिणाम म्हणून कि काय गोव्याच्या प्रदेशाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यातील तरुणांना संधी मिळावी यासाठी आपण हे पाऊल उचलत असल्याचे गोव्याच्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी म्हटले आहे.  शांताराम नाईक हे येत्या १२ मार्चला वयाची ७२ वर्षे पूर्ण करत आहेत.  राज्यातील युवा पिढीला आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी आपण राजीनामा देत आहोत, असे त्यांनी म्हटले. तसेच, राहुल गांधी यांच्या भाषणानंतर आपण तत्काळ राजीनामा देणार होतो. पण, आपण स्वत:ला सावरले असल्याचे स्पष्टीकरण देखील त्यांनी दिले. महत्त्वाचे असे की, नाईक हे पहिले असे नेते आहेत ज्यांनी राहुल गांधी यांच्या भाषणानंतर प्रेरित होऊन पदाचा राजीनामा दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)