गोव्याचा निकाल 11 मार्चला दुपारी 2 पर्यंत जाहीर करणार

निवडणुक अधिकाऱ्यांची माहिती
पणजी – गोव्यात 4 फेब्रुवारी रोजी झालेल्या 40 विधानसभा मतदारसंघांसाठीच्या निवडणुकीचा निकाल 11 मार्च रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याचे निवडणुक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. याच दिवशी मार्गाओ आणि पणजी येथे एकाच वेळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
या ठिकाणी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून पुढील सहा तासांत निकालही जाहीर केले जाणार आहेत. सकाळी 10 वाजता पहिला निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. त्यानंतर टप्प्याटप्यांनी दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व मतदारसंघातील निकाल जाहीर केले जाणार आहेत. गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी ही माहिती दिली आहे.
एकाच टप्प्यात झालेल्या गोवा आणि दक्षिण गोव्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तब्बल 82 टक्के मतदान झाले आहे. गोव्यातील जनतेला येथे चौरंगी लढत पहायला मिळाली. यासाठी भाजप, कॉंग्रेस, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी-शिवसेना-गोवा सुरक्षा मंच युती आणि आम आदमी पार्टी यांच्यात प्रमुख लढत झाली होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)