गोविंदाचे पुन्हा कमबॅक

आगामी “फ्राय डे’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता गोविंदा बऱ्याच दिवसानंतर पुन्हा बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. गोविंदा आणि वरुण शर्मा यांच्या याच चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. यात या दोघांचे मजेशीर डायलॉग पाहण्यासारखे आहेत. ट्रेलरमध्ये गोविंदाची कॉमेडी हसून-हसून पोट दुखवेल अशी आहे. तसेच वरुण शर्माने एका अयशस्वी सेल्समनचे पात्र साकारले आहे. हा चित्रपट अभिषेक डोग्रा यांनी दिग्दर्शित केला आहे.
या चित्रपटातील डायलॉग ऐकले असता 90च्या दशकातील “हीरो नंबर 1′ चित्रपटाची आठवण येईल. या ट्रेलरमध्ये गोविंदा फर्राटे घेत एकदम जबरदस्त डायलॉग बोलतो. तसेच वरूण आणि गोविंदा याची कॉमेडी प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणार आहे.

प्रदर्शित होता होता दोनदा हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला होता. पहिल्यांदा 11 मे रोजी प्रदर्शित होणार होता. पण त्याच तारखेला मेघना गुलजारचा “राझी’ हा चित्रपट रिलीज होत असल्यामुळे तो पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर 25 मे रोजी प्रदर्शित करण्याची तारीख निश्‍चित झाली. पण जूनमध्ये तिसरी तारीख जाहीर करण्यात आली. आता 12 ऑक्‍टोबर ही तारीख नक्की करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)