गोविंदाचा मुलगाही लवकरच बॉलिवूडमध्ये 

गोविंदाने आपला मुलगा यशोवर्धनला बॉलिवूडमध्ये लॉंच करण्याची तयारी केली आहे. यशोवर्धन नुकताच विदेशात शिक्षण घेऊन परतला आहे. त्यामुळे त्याला लवकरच बॉलिवूडमध्ये लॉंच केले जाईल, असे सूतोवाच गोविंदाने केले आहे. मात्र यशला लॉंच करा, असे आपण कोणालाही सांगणार नाही. त्याला आपला रस्ता स्वतःच निवडावा लागणार आहे, असेही गोविंदाने स्पष्ट केले आहे. जेंव्हा त्याला एखादा चांगला रोल दिला जाऊ शकतो, असे एखाद्या प्रॉड्‌क्‍शन हाऊसला वाटले तर त्याचे लॉंचिंग होईल. त्यासाठी यशवर्धननेच स्वतः निर्मात्यांना जाऊन भेटले पाहिजे. बोलले पाहिजे.

प्रयत्न केला पाहिजे. आपण स्वतःही खूप संघर्ष केला आहे. तसच संघर्ष यशनेही केला तरच त्याला यशस्वी होण्याचे महत्व समजू शकेल, असे गोविंदा म्हणतो. आपण स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकलो नाही. याचे आपल्याला दुःख आहे. मात्र आपल्या मुलाने विदेशात जाऊन स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे त्याला आपल्यापेक्षा फिल्म मेकिंगचे आपल्या पेक्षा अधिक ज्ञान आहे, याचा आपल्याला खूप अभिमान वाटतो आहे, हे सांगण्यासही गोविंदा विसरला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)