गोविंदप्रभु जन्मोत्सव उत्साहात साजरा

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील पारगाव शिंगवे येथे गोविंदप्रभु जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. बढेकरमळा येथील महानुभाव पंथाच्या आश्रमात रुस्तुम महाराज साखरखेडकर भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात कार्याध्यक्ष कृष्णराजबाबा शास्त्री, सभाध्यक्ष पातुरकरबाबा, दत्तराज बाळापुरकर, कुलाचार्य देवदत्त आश्रम, मोठेबाबा अंकुळनेरकर, दत्तराजबाबा सिन्नरकर, युवराज शास्त्री, केशराजबाबा अंजनगावकर, गोविंदराजशास्त्री अंजनगावकर, तळेगावकर बाबा, कृष्णराज शास्त्री, देवेंद्रराज शास्त्री उर्फ बायराजबाबा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विट्टल केशव मोडक, बाबाराव पोपट मोडक, भास्कर भोर, गंगाराम जाधव, शिवाजी पडवळ यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात शिवाजी ढोबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मोठेबाबा अंकुळनेरकर यांनी सांगितले की, श्रीगोंविदप्रभु व श्री चक्रधर स्वामींनी समान स्वरुपाचा समतोल राखला. आद्य मराठी भाषेत धर्मग्रथांची रचना श्री चक्रधर स्वामींनी केली. समता, बंधुत्व, प्रेम, अहिंसा, पुरस्कार, जातीधर्मांची शृखंला तोडुन त्यांनी आपल्या कृतीतुन समाजाला न्याय दिला. सूत्रसंचालन संदीप शास्त्री परांडेकर आणि योगीराज कपाटेकर यांनी केले. सरपंच बबन ढोबळे व विट्टल ढोबळे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)