गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षांचा राजीनामा

राहुल गांधींच्या भाषणाचा झाला परिणाम
नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या जुन्या नेत्यांनी युवा नेतृत्वासाठी वाट करून द्यावी असे आवाहन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कॉंग्रेस महासमितीच्या अधिवेशनात केले होते. त्या आवाहनामुळे प्रभावित होऊन गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष शांताराम नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी थेट राहुल गांधी यांच्याकडेच आपला राजीनामा सादर केला आहे. त्यांना पुढच्या महिन्यात 72 वर्ष पुर्ण होत आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांच्या आवाहनानुसार आपण पक्षाच्या युवा नेत्यांना आपली जागा रिकामी करून देण्यासाठी हा राजीनामा देत आहोत असे त्यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात त्यावेळी पक्षातील जुन्या आणि युवा नेत्यांमधील भींत पाडून टाकण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या भाषणाचा मुख्य जोर ज्येष्ठ नेत्यांनी नव्या नेतृत्वाला वाव द्यावा यावर होता. त्या मुद्‌द्‌याने आपण प्रभावीत झालो आहोत असे नाईक यांनी म्हटले आहे. पक्षाध्यक्षांच्या आवाहनाला राजीनामा देऊन प्रतिसाद देण्याचे कॉंग्रेसमधील अलिकडच्या काळातील हे पहिलेच उदाहरण ठरले आहे. नाईक यांची 7 जुलै 2017 रोजी गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. म्हणजेच त्यांच्या नियुक्तीला एक वर्षही अजून पुर्ण झालेले नाही त्याच्या आतच त्यांनी हा राजीनामा दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)