गोवा प्रदेशाध्यक्षपद; काँग्रेसमध्ये दोन गट पडले

पणजी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी प्रयत्न चालवलेल्या दिगंबर कामत यांना पक्षातील बहुतेक आमदारांचा पाठिंबा आहे. तसेच गिरीश चोडणकर यांना पक्ष कार्यकारिणीचे पदाधिकारी, पक्षाचे काही ज्येष्ठ नेते व अमदारांचाही पाठिंबा आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षदावरून सध्या काँग्रेसमध्ये दोन गटात राजकारण सुरु झाले आहे.

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे चेल्लाकुमार यांच्या गोवा भेटीवेळी त्यांना समर्थन देणाऱया काही आमदारांनी कामत यांच्या बाजूने कौल दिल्याचे समजते. कामत हे प्रदेशाध्यक्षपदी राहिल्यास काँग्रेसचे सरकार स्थापन करणे शक्य होणार असल्याचेही चेल्लाकुमार यांना सांगण्यात आले. सध्या राज्यात भाजप सरकारची स्थिती म्हणावी तेवढी चांगली नाही. भाजपचेच काही आमदार बंडोखोरीची भाषा बोलत आहेत. त्यामुळे काँग्रेसला सरकार स्थापन करायला संधी आहे. अशावेळी अनुभवी नेता प्रदेशाध्यक्षपदी असणे काँग्रेससाठी फायद्याचे असल्याची दावेदारी दिगंबर समर्थक आमदारांनी केली आहे. काँग्रेसच्या सोळा आमदारांपैकी किमान दहा आमदारांनी दिगंबर कामत यांच्या बाजूने कौल दिला आहे.

काँग्रेस ज्येष्ठ नेते तसेच पक्षाच्या कार्यकारीणीचे पदाधिकारी हे गिरीश चोडणकर यांच्या बाजूने आहेत. चोडणकर यांचे कार्य व पक्षासाठी केलेला त्याग याचाही उल्लेख काही पदाधिकाऱयांनी चेल्लाकुमार यांच्यासमोर केला. तूर्त सत्ता स्थापनेपेक्षा पक्ष एकसंघ राहणे व जनतेच्या मनातील पक्षाची वाढती प्रतिमा कायम ठेवणे यावरच जास्त भर दिला जावा, असेही काहींनी चेल्लाकुमार यांच्यासमोर स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)