गोवा पासिंगची एकही गाडी सिंधुदुर्गातून जावू देणार नाही – आमदार नितेश राणे 

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार बांधवाना वेटीस धरण्याचे काम गोवा राज्य सरकारकडून सातत्याने होत आहे. गोवाची ही अरेरावी अशी चालू राहील्यास गोवा पासिंगची एकही गाडी जिल्ह्यातून जावू देणार नाही, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी येथे पत्रकार परिषदेतून दिला आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अर्थकारण हे मासेमारीवर आहे. त्यामुळे गोवा सरकार कडून राजकारण केले जात आहे. आम्ही त्यांच्यावर अवंलबून असल्याने अर्थकारण करू शकत नाही असे त्यांना वारंवार वाटते. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाल्याचं राणे यांनी म्हटलं आहे.

जिल्ह्यातील मासे वाहतूक करणार्या वाहतूकदारांच्या प्रश्‍नावर आमदार राणे यांनी आपली भूमिका जाहीर केली.
राणे म्हणाले , जिल्हाच्या किनारपट्टीवर कुठल्या ना कुठल्या मार्गाने संकट येत आहे. मच्छिमार बांधवांना गेल्या साडेचार वर्षांपासून मी वेगळ्या माध्यमातून पाठीशी राहिलेला आहे. मासेविक्रेत्यांना गोवा सरकारकडून वेठीस धरले जात आहे. तरीही ना सरकारी जाग आलेली आहे किंवा पालकमंत्री असताना त्यांनाही याची जाणीव राहीलेली नाही अशी टीकाही राणे यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आरोग्याच्या बाबतीतही उपचार घेण्यासाठी जे रूग्ण गोवा बांबूळी येथे जातात. त्यांना पाठीमागे उभे राहावे लागते. असा अन्याय सुरू आहे. आता मच्छीमारांवर निर्बंध आणून पुन्हा त्रास दिला जात आहे. त्यामुळे आम्हाला आता आरपारची लढाई करावी लागेल, तशी आमची तयारी आहे. मासेमारी विक्रीचा हा प्रश्न सोडवला नाही तर गोव्याच्या गाड्या परत तिकडे जाणार नाहीत असा इशारा श्री. राणे यांनी दिला असून ज्यांना समजायचे ते समजतील असे सुचक व्यकत्वही त्यांनी केले आहे.

बांदा येथे खाजगी तत्वावर मासे मार्केट 

मासेविक्रेत्या सोय व्हावी म्हणून खासगीतत्वावर बांदा येथे मासे मार्केट उभारणार आहोत. त्यासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. खासगी तत्त्वावर मासे मार्केट उभारण्याची तयारी झाली आहे, असे आमदार राणे यांनी जाहीर केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)