गोवर, रूबेला लसीकरण मोहिमेसाठी समन्वय ठेवा

जिल्हाधिकाऱ्यांच्या विभागप्रमुखांना सूचना
सातारा,दि.7 प्रतिनिधी – गोवर व रूबेला लसीकरण मोहिम येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये राबविण्यात येणार असून मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केल्या.
लसीकरण मोहिमेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रभारी जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी नितीन थाडे, जि.प.उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, शिक्षण सभापती राजेश पवार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी सत्यजीत बडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार, इंडियन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.जीवन लाहोटी यांच्यासह पंचायत समितींचे गटविकास अधिकारी व विद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाल्या, गोवर हा संक्रमक व घातक आजार असून त्यामुळे सन.2016 च्या आकडेवारी नुसार देशात दरवर्षी 50 हजार मुलांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे. तर रूबेला सौम्य संक्रमक आजार असला असून तो मुलांना तसेच प्रौढ व्यक्तींना देखील होतो. गर्भवती स्त्रियांना हा आजार झाला तर अचानक गर्भपात अथवा बाळांना जन्मजात शाररिक दोष निर्माण होवून शकतो. त्यामुळे भारत सरकारने गोवर आजाराचे निमुर्लन व रूबेला आजाराचे नियंत्रण करण्याचे उदिष्ट ठेवले आहे. त्यासाठी सरकारने टप्प्या टप्याने गोवर व रूबेला ही लस विविध राज्यातील नियमित लसीकरण कार्यक्रमात समावेश केला आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात संपुर्ण राज्यात लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असून सातारा जिल्ह्यात ही 9 महिने ते 15 वयोगटातील मुलांना लसीकरण करण्यात येणार असून सर्व विभागांनी मोहिम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. तसेच यापुर्वी गोवर व रूबेला हे लस दिली असली तरी त्यांना हा अतिरिक्त डोस द्यायचा आहे. मोहिम 4 ते 5 आठवड्यात पुर्ण करावयाची असून आरोग्य विभागाच्या मदतीने सर्व विभागांनी समन्वय ठेवून शाळांमध्ये पहिल्या 2 ते 3 आठवड्यात व नंतर उर्वरित अंगणवाडी केंद्र व नियमीत लसीकरण व उपकेंद्रे सत्राच्या ठीकाणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
302 :thumbsup: Thumbs up
302 :heart: Love
108 :joy: Joy
225 :heart_eyes: Awesome
106 :blush: Great
69 :cry: Sad
6 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)