गोवर-रुबेला लसीकरण जनजागृती फेरी

ओतूर- ग्रामविकास मंडळ ओतूर (ता. जुन्नर) संचलित चैतन्य विद्यालयाने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार गोवर आणि रुबेला लसीकरण अभियानांतर्गत लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी प्रभातफेरीचे सोमवारी (दि. 26) आयोजन करण्यात होते. या प्रभातफेरीत 800 विद्यार्थी सहभागी झाल्याची माहिती मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे यांनी दिली. या लसीकरण मोहिमेला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. गोवरचे दूरीकरण आणि रुबेलाचे नियंत्रण करण्यासाठी 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना लस टोचणे अत्यावश्‍यक आहे, हे पालकांना कळावे, याबाबत जनजागृती व्हावी यासाठी या फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीत उपमुख्याध्यापक संजय ढमढेरे, संतोष कांबळे, मिलिंद खेत्री, लक्ष्मण दुडे, विशाल चौधरी, सोनाली माळवे, अमित झरेकर, गोपाळ डुंबरे, ज्ञानेश्वर वळे, रोहिणी घाटकर, सत्यवान खंडाळे आदी सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)