गोवर-रुबेला लसीकरणानंतर “रिअॅक्‍शन’

दत्तवाडीतील प्रकार : खासगी रुग्णालयात तातडीने उपचार

पुणे – दत्तवाडीतील एका खासगी शाळेतील मुलांना गोवर-रुबेला लस दिल्यानंतर, त्यातील सहा ते सात मुलांना उलटी, चक्कर येण्याचा प्रकार घडला. त्यावेळी शाळा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुलांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली असून, सायंकाळी मुलांना घरी सोडण्यात आले आहे.

-Ads-

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने दत्तवाडी येथील एका खासगी शाळेत लसीकरण मोहीम पार पडली. त्यानंतर काही मुलांना चक्कर, उलटी, डोकेदुखीची लक्षणे दिसून आल्यामुळे पालकांसह शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. त्यावेळी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी खबरदारी म्हणून मुलांना ग्लोबल हॉस्पिटलमध्ये हलविले. दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. याबाबत ग्लोबल हॉस्पिटलच्या डॉक्‍टरांशी संपर्क साधला असता, “लसिकरणाची काही मुलांना अॅलर्जी असू शकते. त्यामुळे उलटी, चक्कर, डोकेदुखी, थंडी वाजून येणे अशी लक्षणे दिसून आली. या मुलांवर तातडीने उपचार सुरू केले. एकूण सात मुला-मुलींचा समावेश असून सहावीत शिकणारी चार तर दुसरीतील दोन मुले आहेत. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून, सायंकाळी या मुलांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील एक मुलगी थोडी घाबरलेली असून, तिला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. हर्षल जाधव यांनी दिली.

डॉक्‍टर म्हणतात…
लसिकरणामुळे मुलांवर कोणताही विपरित परिणाम आतापर्यंत झाला नाही. दत्तवाडीतील खासगी शाळेतील मुलांना लसीकरणानंतर उलटी, चक्कर येणे, डोकेदुखी होत असल्याचा प्रकार घडला. अधिक माहिती घेतली असता या मुला- मुलींना सकाळी नाश्‍ता फारसा केला नव्हता. अशा परिस्थितीत त्यांनी लसीकरण करून घेतले. उपाशीपोटी इंजेक्‍शन घेतल्याने ही लक्षणे दिसून आली. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून जवळच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये मुलांना दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली, अशी माहिती आरोग्य विभागाच्या लसिकरण विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित शहा यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)