गोवर आणि रुबेला मोहिमेचा जिल्ह्यात शुभारंभ

मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या हस्ते

सातारा – गोवर आणि रुबेला हे दोन्ही आजार गंभीर आहेत. या आजारांपासून संरक्षण होण्यासाठी शासनाने गोवर आणि रुबेला लस मोफत उपलब्ध करुन दिली असून पालकांनी पाल्यांच्या निरोगी आयुष्यासाठी ही लस द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केले.

येथील आदर्श विद्या मंदिर या शाळेत गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या हस्ते झाला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी नगराध्यक्ष माधवी कदम, प्रांताधिकारी किर्ती नलवडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर, गटविकास अधिकारी अमिता गावडे, नगरसेविका स्नेहा नलवडे, मुख्याध्यापक विक्रम कदम, डॉ. सुरेश पाटील, शर्मिली पवार आदी यावेळी उपस्थित होते.

गोवर आणि रुबेला लस खासगी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असायची पण शासनाने ही लस सर्वांसाठी मोफत उपलब्ध करुन दिली आहे. ही लस सर्व खासगी शाळा व शासकीय शाळांमध्ये मोफत देण्यात येणार आहे. शालेय मोहिमेदरम्यान लसीकरण न झालेल्या लाभार्थींना विशेष बाह्य संपर्क सत्रामधुन लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच अति जोखमीच्या भागामध्ये व ऊस तोड कामगारांच्या लाभार्थींनाही फीरत्या पथकाद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. असे सिंघल यांनी सांगितले. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष माधवी कदम यांनी यावेळी केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी प्रास्ताविक तर आभार डॉ. सुरेश पाटील यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)