मुंबई : घराचे काम सुरू असताना घराचा भाग कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची, तर एक कामगार जखमी झाल्याची घटना गोवंडी शिवाजीनगर येथे घडली. विजयकुमार राजपाल (३३) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे, तर जखमी कामगाराचे नाव रोहितकुमार शर्मा आहे.

गोवंडीतील गजानन नगर परिसरात प्लॉट नंबर २ येथे घराच्या दुरुस्तीसाठी काही भाग कामगारांकडून तोडला जात होता. तेव्हा हा भाग कामगारांवर कोसळला आणि यात दोन कामगार अडकले. स्थानिकांनी ढिगारा बाजूला करून दोघांना शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र विजयकुमार राजपाल यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)