गोळीबार करत पाच जणांना लुबाडले

पिंपरी – शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये बसलेल्या पाच जणांना आठ ते दहा जणांच्या टोळीने कोयत्याचा आणि पिस्तुलाचा धाक दाखवला तसेच पिस्तुलातून गोळीबार करत 2 लाख 67 हजार रूपये किमतीचा ऐवज लुबाडून नेला. ही घटना मावळ तालुक्‍यातील सुदूंबरे येथे घडली.

राजु सिताराम दरवडे (वय 40, रा. कान्हेवाडी, इंदोरी, ता. खेड) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 29 ऑक्‍टोबर रोजी दरवडे हे त्यांचे मित्र राहुल येवले यांच्यासह पाच मित्रांबरोबर सुदूंबरे येथील बाबाजी गाडे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये बसले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास आठ ते दहा जणांची टोळी शेडमध्ये घुसली. त्यांनी कोयत्याचा आणि पिस्तुलाचा धाक दाखवत पैसे आणि ज्या वस्तु तुमच्याकडे आहेत, त्या द्या अशी मागणी केली. तिघा दरोडेखोरांनी पिस्तुल काढले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एकाने हवेत दोन गोळ्याही झाडल्या. दरवडे यांनी त्यांच्याकडील एक लाखाची रोकड आणि मोबाईल दिला. राहुलनेही एक लाख रूपये किमतीची सोनसाखळी आणि मोबाईल दिला. तसेच इतर तीन जणांचे मोबाईलही दरोडेखोरांनी जबरदस्तीने काढून घेतले आणि पोबारा केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)