Video : गोळीबारातील आरोपी पकडण्यास गेलेल्या पोलीस निरीक्षकावरच गोळीबार 

पुणे स्टेशनवरील फलाट क्रमांक 3 वर थरार : दोन गोळ्या शरीरात घुसल्या 

पुणे: चंदननगर येथील महिलेच्या खुनातील आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याने खळबळ उडाली. या घटनेत पवार यांना पोटात व पायात गोळी लागून ते गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पुणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर घडली. याप्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसानी अटक केली आहे.

बुधवारी सकाळी चंदननगर परिसरातील आनंद पार्क येथील इंद्रायणी गृहरचना सोसायटीमध्ये एका महिलेवर गोळीबार झाला होता. त्यामध्ये एकता ब्रिजेश भाटी (38) यांचा मृत्यू झाला. सकाळी सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, गुन्हे शाखेचे उपायुक्‍त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक आयुक्‍त समीर शेख, युनिट-2 चे पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संग्रहित करून त्याव्दारे आरोपींचा शोध सुरू केला.

दरम्यान, संशयितांची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. संशयित पुणे रेल्वे स्टेशनवरुन झेलम एक्‍सप्रेसने दिल्लीला जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन पवार यांना समजली. त्यानंतर निरीक्षक पवार आणि त्यांच्या पथकातील पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरात प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर सापळा रचला. संशयित आरोपी त्यांच्या टप्प्यात देखील आले.

मात्र, त्याचवेळी एका आरोपीने अचानक त्यांच्या दिशेने गोळीबार केला. गर्दीचे ठिकाण असलेल्या पुणे स्टेशन परिसरात भरदिवसा गोळीबार झाल्याने प्रचंड खळबळ उडाली. गोळीबारात जखमी झालेले पोलिस निरीक्षक पवार यांना तातडीने रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वे स्थानकावरील आरपीएफच्या पोलिसांनी एका आरोपीस तत्काळ अटक केली, तर दुसरा आरोपी पिस्तूलसह पसार झाला. मात्र, त्याचा पोलिसांनी पाठलाग करत थोड्याच वेळात त्यास समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शस्त्रासह ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकच गोळीबारात जखमी झाल्याचे समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रुबी रुग्णालयात धाव घेतली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)