गोळीबारप्रकरणी आरोपी गजाआड

पिंपरी – चिंचवड वाल्हेकरवाडी येथील शिवाजी चौकात झालेल्या गोळीबार प्रकरणाचा छडा लावण्यास चिंचवड पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींकडील दोन पिस्टल व पाच जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

रस्त्यात दुचाकी लावल्याच्या कारणावरुन सोमवारी (दि. 20) झालेल्या भांडणात सराईत गुन्हेगार जयवंत चितळकर याला मारायला आलेल्या दौला नदाफवर चितळकरने त्याच्याकडील पिस्टल नदाफवर रोखले. मात्र, नदाफने ते हिसकावुन घेतल्याने सुटलेली गोळी चितळकरच्या दंडात घुसली. मात्र, थेरगावमधील खासगी रुग्णालयातील उपचारावेळी त्याने हाताला सळई लागल्याचे सांगितले. निलेश कोळपे या दुसऱ्या जखमीवर उपचार करुन सोडुन देण्यात आले. मात्र, चिंचवड पोलिसांत अज्ञात आरोपींवर जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना घटनास्थळी एक पुंगळी व रक्‍ताचे डाग पोलिसांना आढळले. तसेच सीसीटीव्हीने मारामारीची दृश्‍य टिपली होती. त्यानंतर चितळकरला विश्‍वासात घेऊन चौकशी केल्यानंतर सर्व घटना उघडकीस आली.

त्याने केलेल्या वर्णनावरुन चिंचवड पोलिसांनी दौला जबार नदाफ (वय-27, रा. पिंपळे गुरव), अजमत शेख (वय-28, रा वेताळनगर, चिंचवड), सद्दाम शौकत अल नदाफ (वय-27, रा, बिजलीनगर, चिंचवड), शिवाजी तानाजी सोलणकर (वय-21, मोरयानगर, चिंचवड )यांना अटक करुन, त्यांच्याकडून एक पिस्टल आणि एक जिवंत काडतुसे जप्त केली. या गुन्ह्यातील तपासादरम्यान जखमी निलेश कोळपेकडे देखील एक पिस्टल असल्याची माहिती समोर आली. त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून एक पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त केली.

परिमंडळ तीनचे पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग सतिश पाटील व वरिष्ठ पोलीस निरिक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, पोलीस उपनिरिक्षक रघुनाथ सोडनवर, पोलीस शिपाई राहुल मिसाळ, देवा राऊत, पंकज भदाणे, सचिन वर्णेकर, अमोल माने, तुषार मेटकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)