गोल्ड क्‍लस्टरमुळे नगरची नवी ओळख होणार

खा.दिलीप गांधीःमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच लोकार्पण
नगर – नगरमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने उपलब्ध झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या गोल्ड क्‍लस्टरमुळे नगरची नवी ओळख निर्माण होणार असून, नावलौकिकात भर पडणार आहे. या गोल्ड क्‍लस्टरमुळे जिल्ह्यातील ज्वेलरी व्यवसायात शुद्धता, पारदर्शकता व प्रामाणिकपणा येऊन व्यसायात मोठ्या प्रमाणात वृद्धी होणार आहे. यामुळे सराफ व्यवसायाकांबद्दल अधिक विश्‍वसार्हता निर्माण होईल. हॉलमार्क मानांकन मिळविण्यासाठी या आधी सर्वांना पुणे, मुंबईला जावे लागत असे. या गोल्ड क्‍लस्टरमुळे नगरमध्येच हॉलमार्क मिळणार असल्याने व्यावसायिकांचा मोठ्या प्रमाणात वेळ व पैसा वाचणार आहे. याचा फायदा सर्व ग्राहकांना होणार आहे.अशी माहिती खा.दिलीप गांधी यांनी दिली.
आता नागरिकांना ब्रॅण्डेड व आकर्षक वस्तू पाहिजे आहेत. या गोल्ड क्‍लस्टरमुळे ब्रॅण्डेड सोने उपलब्ध होणार आहे. प्रकाश लोळगे यांनी या गोल्ड क्‍लस्टरच्या उभारणीसाठी सातत्याने पाठपुरवठा केला. त्यांच्या जिद्दीमुळेच हे गोल्ड क्‍लस्टर पूर्णत्वास येत आहे. नगरच्या नावलौकिकात व वैभवात भर घालणाऱ्या या गोल्ड क्‍लस्टरचे लोकार्पण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्रीगणांच्या उपस्थित व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य समारंभाने लोकार्पण होणार आहे, अशी माहिती दिली.
रामचंद्र खुंट येथील करशेटजी रोड येथे उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक गोल्ड ज्वेलरी कौन्सिल (क्‍लस्टर) चे काम पूर्णत्वास येत असून, खा.दिलीप गांधी यांनी गोल्ड क्‍लस्टरला भेट देऊन सर्व अत्याधुनिक मशिनरीची पाहणी केली. गोल्ड क्‍लस्टरचे अध्यक्ष प्रकाश लोळगे यांनी सर्व यंत्र सामुग्रीबद्दल प्रत्याक्षिकासह सविस्तर माहिती देऊन खा.दिलीप गांधी यांचा सत्कार केला. यावेळी संजय शिंगवी, सुभाष कायगांवकर, राजेंद्र शहाणे, अमोल देडगांवकर, श्‍यामराव देडगांवकर, ईश्‍वर बोरा, प्रमोद बुर्हाडे, कैलास मुंडलिक, संजय वालकर, राजेंद्र लोळगे, दत्ता मैड, सोमनाथ मैड, श्‍याम मुंडलिक, वैजिनाथ चिंतामणी, श्‍याम लोणकर, पियुष भंडारी, प्रकाश डहाळे, भाजपा सरचिटणीस किशोरा बोरा, पुण्याचे उद्योजक संजय कांबळे, गोपाल वर्मा आदिंसह सराफ, सुवर्णकार व्यवसायिक उपस्थित होते.
यावेळी अत्याधुनिक गोल्ड क्‍लस्टरबद्दल माहिती देतांना अध्यक्ष प्रकाश लोळगे म्हणाले, खासदार दिलीप गांधी यांच्या सहकार्यामुळे व पाठपुरवठ्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून नगरच्या या अत्याधुनिक गोल्ड क्‍लस्टरकरीता सुमारे 6 कोटीहून अधिक निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतूनच हे अत्याधुनिक गोल्ड क्‍लस्टर उभारण्यात आले असून, अनेक अत्याधुनिक स्वयंचलित यंत्र सामुग्री येथे कार्यान्वित झाली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे 50 हजार सुवर्णकार व्यवसायिकांना फायदा होणार आहे. तसेच दोनशे कारागिरांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
या अत्याधुनिक यंत्र सामुग्रीद्वारे दागिनी घडवितांना अधिक सुबकता व आकर्षक नवनवीन डिझाईन करता येणार असून, दागिणे घडणावळीचा मोठा वेळ वाचणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना कुशल प्रशिक्षकाद्वारे प्रशिक्षण देण्याची सुविधा येथे उपलब्ध आहे. आज तगायत सुवर्णकार व्यवसायिकांना सोने परिक्षणचे 99.50चे प्रमाणपत्र प्राप्त होत होते. मात्र गोल्ड क्‍लस्टरमधील अत्याधुनिक यंत्रांमुळे सराफ व्यवसायिकांना 99.99 चा दर्जा मिळणार आहे. त्यामुळे सुवर्णकार सराफ व्यवसायामध्ये अधिक पारदर्शकता व शुद्धता येणार आहे. खा.दिलीप गांधी यांच्या बहुमोल सहकार्यामुळे हे गोल्ड क्‍लस्टर उभे राहीले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)