“गोल्ड’मधून मॉनी रॉयचे अक्षय कुमारबरोबर पदार्पण

छोट्या पडद्यावर प्रसिद्धी मिळवलेली ऍक्‍ट्रेस मौनी रॉय आता अक्षय कुमार बरोबर “गोल्ड’मधून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. त्याशिवाय करण जोहरच्या “ब्रम्हास्त्र’मध्ये रणबीर कपूर, अलिया भट आणि अमिताभ बच्चन यांच्याबरोबरही ती दिसणार आहे. मात्र “ब्रम्हास्त्र’मध्ये ती नकारात्मक रोलमध्ये असणार आहे.

या दोन्ही सिनेमांमधील मौनीचे शुटिंग पूर्ण झाले आहे. त्यामुळे ती अगदी आरामात आपल्या बॉलिवूड डेब्यू फिल्मची वाट बघत बसली आहे. याच दरम्यान तिला बॉलिवूडमधील आणखी एक बिग बजेट प्रोजेक्‍ट मिळाला असल्याचे समजते आहे. तिच्यासाठी तर ही एकदम लॉटरीच असणार आहे. जॉन अब्राहमबरोबर “रॉ’मध्येही मौनी असणार आहे, असे समजते आहे. “रॉ’ हा एक हेरगिरीविषयीचा थ्रिलर आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“परमाणू’नंतर जॉन या त्याच्या आगामी सिनेमाच्या तयारीला लागला आहे. यामध्ये तो 26 वर्षांपासून 85 वर्षांच्या वृद्धापर्यंतच्या एकाच व्यक्तीच्या 8 छटा तो साकारणार आहे. मौनीचा रोलमात्र त्या दृष्टीने जरा मर्यादितच असेल. याच वर्षी “रॉ’चे शुटिंग सुरू होणार आहे. गुजरात, श्रीनगर आणि नेपाळमध्ये हे शुटिंग होणार आहे. “नागिन’च्या रोलमुळे लोकप्रिय झालेल्या मौनीला खूपच चांगल्या ऑफर आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)