गोल्डन ग्लोब अॅवार्डवरून लेडी गागा भावूक

76 व्या गोल्डन ग्लोब अॅवार्डसच्या सोहळ्यात लेडी गागाने “स्टार इज बॉर्न’ या चित्रपटातील गाण्यासाठी ओरिजनल सॉन्ग कॅटेगरीत अॅवार्ड जिंकला. यंदा कॅलिफोर्नियामध्ये या सोहळ्याचे आयोजन केले गेले होते. हा पुरस्कार मिळाल्यानंतर लेडी गागा काहीशी भावूक झाली. म्युझिक इंडस्ट्रीत महिलांना फार गंभीरपणे घेतले जात नाही. हा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, असे ती म्हणाली. अॅवॉर्ड जिंकल्यानंतरचा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागला आहे. “अ स्टार इज बॉर्न’ ला जनरल कॅटेगरीमध्ये अॅवॉर्ड मिळण्याची अपेक्षा सर्वच फॅन्सला होती. मात्र त्या ऐवजी ग्लेन क्‍लोजच्या “द वाईफ’ ला हा पुरस्कार मिळाला. त्यामुळे लेडी गागाच्या फॅन्सनी ट्‌विटरवरून खूप नाराजी व्यक्‍त केली आणि गोल्डन ग्लोब अॅवार्डमध्ये चक्क फिक्‍सिंग झाल्याचा आरोपही केला. हे ट्रोलिंग गेल्या 2-3 दिवसांपासून सुरु आहे.

डेरेन क्रिसने बेस्ट अॅक्‍टर (लिमिटेड सीरिज) द एसेसिनेशन ऑफ जियानी वर्सेस: अमेरिकन क्राईम स्टोरीसाठी आपला पहिला गोल्डन अवॉर्ड जिंकला. तर “द वाईफ’साठी अभिनेत्री ग्लेन क्‍लोज हिने बेस्ट अॅक्‍ट्रेसचा अॅवॉर्ड जिंकला. क्रिश्‍चियन बेलला “वाइस’साठी बेस्ट अॅक्‍टरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. बेस्ट अॅक्‍ट्रेस इन मोशन पिक्‍चरच्या कॅटेगरीत ओलिविया कोलमन हिला “द फेवरेट’साठी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. डेरेने क्रिसने बेस्ट अॅक्‍टर (लिमिटेड सीरिज) द असेसिनेशन ऑफ जियानी वर्सेज : अमेरिकेन क्राईम स्टोरीसाठी आपला पहिला ग्लोडन ग्लोब अॅवॉर्ड जिंकला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गोल्डन ग्लोब हा जगातील एक प्रमुख एक सिने पुरस्कार सोहळा आहे. अमेरिकेच्या हॉलिवूड मधील 93 सदस्य असलेल्या हॉलिवूड फॉरिन प्रेस असोसिएशन या संस्थेद्वारे दरवर्षी अमेरिकन व आंतरराष्ट्रीय चित्रपट तसेच दूरचित्रवाणी मालिकांना गोल्डन ग्लोब पुरस्कार दिले जातात. जानेवारी 1944 पासून ऑस्कर पुरस्कारासह गोल्डन ग्लोब हा चित्रपटसृष्टीमधील एक मानाचा पुरस्कार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)