विश्रांतवाडी- देशाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या तेजस्वीनी सावंत-दरेकर या भारताच्या गोल्डन गर्लने थ्री पोझीशन प्रकारात राष्ट्रकुल स्पर्धेतील विक्रम रचत सुवर्णपदक पटकाविले. या गोल्डन गर्लचे रविवारी (दि.15) सकाळी पुण्यनगरीत आगमन झाले. ऑस्ट्रेलियातल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक रौप्य अशा दोन पदकांची मानकरी ठरलेली नेमबाज तेजस्विनी सावंतचं पुण्यात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
यावेळी भाजपाचे पुणे शहर चिटणीस महेंद्र गलांडे यांच्यासह शेकडो नागरिक व महिलांच्या उपस्थितीत तेजस्विनीचे पुणे विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी तिचा शाल, श्रीफळ व पेढा भरवून जंगी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मोहन मातेरे, वैभव भुजबळ, विनीत वाजपेयी, हनुमंत खांदवे, अजय शर्मा, हेमंत गादिया, उषा वाजपेयी, कविता गलांडे, आशा गलांडे, राहूल वाडेकर, संतोष पांडे, अमित जैन, रवींद्र गलांडे, युवराज बाबर, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा