गोलेगावात सुनेला पाजले किटकनाशक

आळंदी- सासऱ्याला दारु आणून दिली नाही म्हणून सुनेला मारहाण करत, कीटकनाशक पाजल्याची घटना आळंदी परिसरातील गोलेगाव (ता. खेड) येथे घडली. सुदैवाने या घटनेतून सून बचावली आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. 23) आळंदी पोलीस ठाण्यात सासू, सासरे आणि दोन नणंद अशा चौघांवर मारहाण आणि जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता संतोष चौधरी असे कीटकनाशक पाजण्यात आलेल्या तथा फिर्यादी सुनेचे नाव आहे. तर सासरा बाळू बाबू चौधरी (रा. गोलेगाव, ता. खेड), सासू चंपा बाळू चौधरी, नणंद सुरेखा बाबन वाघोले (रा. दारुंबरे, ता. मावळ), रेखा दादा गव्हाणे (रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आळंदी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सासरा बाळू चौधरी यांनी सुन अनिता चौधरी यांना दारु आणायला सांगितली. पण त्यांनी नकार दिल्याने रागावलेल्या सासऱ्याने तिला शिवीगाळ करीत हाताने आणि काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकारात सासू आणि दोन नंदांनीही साथ दिली. हा प्रकार इथेच थांबला नाही तर तिने घर सोडून जावे म्हणून घरात असलेले कीटकनाशक पाजून सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एल. डी. शिंदे करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)