गोलंदाज उमेश यादवच्या घरावर चोरट्याचा डल्ला

नागपूर – भारताचा जलदगती गोलंदाज उमेश यादवच्या घरात चोरी झाली. ही घटना शहरातील शंकरनगर परिसर घडली सोमवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. चोरट्यांनी घरातून सुमारे 45 हजार रुपयांची रोकड आणि दोन मोबाईल फोन लंपास केल्याचे समजते. याप्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

उमेश यादव कुटुंबासमवेत बाहेर गेला होता. इमारतीमध्ये नवव्या मजल्यावर त्याचे घर असून तो परतल्यानंतर चोरीचा प्रकार त्याच्या लक्षात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)