गोरेगावमध्ये क्रेन कोसळल्याने वाहतूक कोंडी

मुंबई : पुलाच्या बांधकामादरम्यान गर्डर आणि क्रेन कोसळल्याची घटना मुंबईतल्या गोरेगावमधल्या एसव्ही रोडवर घडली. सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी झालेले नाही. पण यामुळे एसव्ही रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली होता.

शनिवारी रात्री इथे पुलाचे काम सुरु होते. पुलाच्या बांधकामादरम्यान गर्डर आणि क्रेन कोसळले. सुदैवाने यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाही. पण यामुळे परिसरात मोठी वाहतूककोंडी झाली होती. दरम्यान, आज सकाळपासून गोरेगाव इथला एमटीएनएल चौक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तर वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे. सध्या ही क्रेन हटवण्याचं काम सुरु असून वाहतूक पूर्ववत होण्यासाठी 4 ते 5 तास लागतील असं सांगण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)