गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला भीषण आग

मुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस 1 या ईमारतीला रविवारी दुपारच्या सुमारास आग लागली. ही आग भीषण स्वरूपाची असून ईमारतीमध्ये काही लोक अडकल्याची शक्यता आहे. त्यामुळे या दुर्घटनेत जीवितहानी होण्याची भीती आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार या आगीची तीव्रता जास्त असल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने याठिकाणी धाव घेतली. सध्या अग्निशमन दलाचे 12 बंब आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, ईमारतीच्या आतमध्ये काही लोक अडकल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या लोकांना सुखरुपपणे बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ईमारतीचे अनेक मजले आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून संपूर्ण परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)