गोरेगावकरांना आता शुद्ध पाणी

राजगुरुनगर- गोरेगाव (ता. खेड) येथे आज (मंगळवारी) ग्रामपंचायतच्या 14 व्या वित्तआयोगाच्या निधीतून नागरिकांना पिण्याचे पाणी शुद्धीकरण (आरो) करण्याचा प्लॅंट बसविण्यात आला आहे. यावेळी ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. नायफड-वाशेरे जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव येथे प्लॅंटचे उद्‌घाटन भाजप पुणे जिल्हा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सचिन लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच नामदेव गवारी, ग्रामसेविका व्ही. डी. भागडे, भाजपचे खेड तालुका आदिवासी विभागाचे अध्यक्ष अनंता भागीत, माजी सरपंच सुशाबाई फलके, उपसरपंच रमेश गवारी, माजी उपसरपंच विकास काठे, आरो प्लॅंटचे थोरात, संजविनी हॉस्पिटलचे आरोग्य अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक गणेश मोरे, शिवाजी पोखरकर आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते. योजनेमुळे गावातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी 1 रुपयात 2 लिटर मिळणार आहे. आदिवासी भागात प्रथमच हा उपक्रम राबविण्यात आला असून ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. याबरोबरच ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्तआयोग निधीतून संपूर्ण गावासाठी संजीवनी हॉस्पिटल मंचर यांच्यामार्फत सर्व ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)