गोरखपूर रुग्णालयात एका महिन्यात 290 बालकांचा मृत्यू

संग्रहित छायचित्र

वर्षभरात 1250 बालकांचा मृत्यू

उत्तर प्रदेश – गोरखपूर येथील राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत 290 बालकांचा मृत्यू झाला आहे. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या रविवारी आणि सोमवारी नवजात अतिदक्षता कक्ष (एनआयसीयू) मध्ये 26 तसेच इंसेफेलाइटिस वॉर्डमध्ये 11 सहित एकूण 37 बालकांचा मृत्यू झाला. यावर्षी आतापर्यंत इंसेफेलाइटिस, एनआयसीयू तसेच सामान्य बालविभागात एकूण 1250 बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती, मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ.पी. के. सिंह यांनी दिली.

एका संकेतस्थळावर दिलेल्या वृत्तानुसार, यावर्षी दि. 28 ऑगस्टपर्यंत एनआयसीयूमध्ये 213 आणि इंसेफेलाइटिस वॉर्डमध्ये 77 सह एकूण 290 बालके दगावली. एनआयसीयूमध्ये गंभीर स्थिती असलेले बालके यामध्ये वेळेपूर्वी जन्मलेले, कमी वजन असलेले, काविळ, न्यूमोनिया आणि विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या मुलांवर उपचार केले जाते. तर इंसेफलाइटिसमुळे पीडित मुलेही ऐनवेळी याच रूग्णालयात गंभीर स्थितीत येतात. जर हिच बालके उपचारासाठी योग्य वेळी येथे आणली तर त्यांचा मृत्यू रोखला जाऊ शकतो, असे डॉ. सिंह म्हणाले.

अपर आरोग्य संचालक कार्यालयातून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार जानेवारीमध्ये एनआयसीयूत 143 आणि इंसेफेलाइटिस वॉर्डात 9 बालकांचा मृत्यू झाला. याचप्रकारे फेब्रुवारीत 117 व 5, मार्चमध्ये 141 आणि 18, एप्रिलमध्ये 114 व 9, मेमध्ये 127 आणि 12, जूनमध्ये 125 व 12, जुलैमध्ये 95 आणि 33 त्यानंतर ऑगस्ट महिन्यात 28 तारखेपर्यंत 213 व 77 बालकांचा मृत्यू झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)