गोरखपूरमधील 36 मुलांच्या मृत्यूप्रकरणातील दोषींवर कारवाईचे मुख्यमंत्र्याचे आश्वासन

गोरखपूर : गोरखपूरमधील 36 मुलांच्या मृत्यूप्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे. योगी आदित्यनाथ यांनी आज रुग्णालयाचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा हे देखील उपस्थित होते. या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आश्वासन दिले.
या घटनेची चौकशीचे आदेश दिले असून, चौकशी अहवालानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाईल. तसेच या प्रकरणाची पंतप्रधान मोदींनीही गंभीर दखल घेतली असून, पंतप्रधानांकडून मदतीचं आश्वासन मिळाल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री यावेळी प्रचंड भावूक झाले होते.
माध्यमांतून होणाऱ्या रिपोर्टिंग बाबतही मुख्यमंत्र्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री म्हणाले की, ”माध्यमांनी या प्रकरणातील चुकीच्या माहितीवर नाही, तर वास्तविक रिपोर्टिंग केले पाहिजे. यासाठी माध्यम प्रतिनिधींनी स्वत: रुग्णालयात जाऊन पाहाणी करावी. तिथे मिळणाऱ्या माहितीच्या आधारेच माध्यमांनी रिपोर्टिंग करावे. त्यासाठी माध्यम प्रतिनिधींना सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आदेश, रुग्णालय प्रशासनला दिले आहेत,” असं त्यांनी यावेळी सांगितले. ”Encephalitis (मेंदूचा ताप) विरोधात 1996 पासून मी लढा देत आहे. यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी संसदेत वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे या आजाराविरोधात सर्वांनी एकजूट होऊन लढण्याची गरज आहे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)