गोरखपुर प्रकरण : सरकारनेच निधी दिला नाही – डॉ. मिश्रा

गोरखपुर – ऑक्‍सिजन सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला वेळेवर बिले अदा केली नाहीत असा ठपका रूग्णालयाच्या प्रशासनावर ठेवण्यात येत असला तरी या रूग्णालयाचे निलंबीत प्रमुख डॉ मिश्रा यांनी सांगितले की ही बाब खरी नाही. मी स्वतानिधीच्या कमरतेविषयी तीन वेळा पत्रे पाठवली होती.

3 जुलै, 19 जुलै आणि 3 ऑगस्टला ही पत्रे पाठवण्यात आली होती पण सरकराने निधी दिला नाही. एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्येही ही बाब मी सरकारच्या निदर्शनाला आणून दिली होती असेही डॉ मिश्रा यांनी नमूद केले. सरकारी निधी न आल्यामुळेच कंत्राटदाराला पैसे दिले गेले नाहीत हेही त्यांनी निक्षुन सांगितले.

दरम्यान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनीही आज पत्रकार परिषदेत सरकारच्या अनागोंदीवर सडकून टीका केली. या बालकांची सरकारी अनास्थेमुळेच हत्या झाली आहे असे ते म्हणाले. आता आपल्यावरील ठपका टाळण्यासाठी अन्य कोणाला तरी बळीचा बकरा बनवले जात आहे असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)