गोरक्षकांच्या हिंसा प्रकरणी सर्वोच्च न्यायालाकडून तीन राज्यांना नोटीस

नवी दिल्ली : देशातील कथित गोरक्षकांच्या हिंसा रोखण्यात अपयश आलेल्या तीन राज्यांना सर्वोच्च न्यायालयाने अवमान नोटीस पाठवली आहे. राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेश ही तीन राज्य कथित गोरक्षकांचे हल्ले रोखण्यात अपयशी ठरली असून या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना चांगलेच फटकारले आहे. या तिन्ही राज्यांच्या मुख्य सचिवांना अवमान नोटीस पाठवून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना धारेवर धरले आहे.
या प्रकरणात तुषार गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेत त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही राज्य सरकारे गोरक्षकांना लगाम घालण्यात अपयशी ठरली आहेत, असे नमूद केले आहे. गांधी यांनी याचिकेत कथित गोरक्षकांकडून झालेल्या सात हल्ल्यांचाही उल्लेख केला आहे. राजस्थानमध्ये गोरक्षकांकडून पहलू खान नामक व्यक्तीची मारहाण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणात सप्टेंबर 2017मध्ये झालेल्या सुनावणीतही सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान सरकारला खडे बोल सुनावले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)