गोपीनाथराव मुंडेच्या हत्याप्रकरणी ‘रॉ’ मार्फत चौकशी करा : सुप्रिया सुळे

File photo

पुणे – युरोपमध्ये इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन (IJA) कडून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने अमेरिकन सायबर एक्स्पर्टला बोलवण्यात आले होते तेव्हा अमेरिकन सायबर एक्स्पर्ट सईद शूजा याने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएम हॅक होऊ शकतं की नाही, याबाबत अमेरिकन सायबर एक्स्पर्टने मोठा दावा केला आहे. की, 2014 च्या निवडणुकीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंग माहित होतं, त्यामुळेच त्यांची हत्या झाली. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी संबंधित प्रकरणाची रॉ मार्फत चौकशी झाली पाहिजे,अशी मागणी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मतदान हे यंत्रापेक्षा (ईव्हीएम) मतपत्रिकेवर घ्यावे,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेससह सोळा पक्षांनी यापूर्वी केलेली आहे. मतदान यंत्रातील गैरव्यवहाराची सीबीआय चौकशीची मागणी केली होती, मात्र  सीबीआयवरील आमचा विश्वास कमी झाला आहे. गोपीनाथ मुंडे यांची हत्या मतदान यंत्रातील घोटाळ्यातून झाल्याचा दावा  अमेरिकन सायबर एक्स्पर्ट सईद शूजा यांनी केला आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींची चौकशी आंतरराष्ट्रीय रॉ (रिसर्च अँड ॲनॅलिसिस विंग) संस्थेमार्फत करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)