गोपाळपूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

संग्रहित छायाचित्र

गोपाळपूर – नेवासा तालुक्‍यातील आदर्शगाव गोपाळपूर येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे हे 45 वे वर्ष असून रविवार, दि. 25 मार्चपासून श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर सप्ताहास प्रारंभ होणार आहे.

सप्ताह काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दररोज पहाटे काकडा भजन, हनुमान चालिसा, ज्ञानेश्‍वरी पारायण, प्रवचन, सायंकाळी हरिपाठ व रात्री 9 ते 11 या वेळेत महाराष्ट्रातील प्रसिध्द कीर्तनकारांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये नंदूमहाराज रामराईकर, उध्दव महाराज मंडलिक, वैभव महाराज माळवदे, आदिनाथ महाराज दानवे, साध्वी सोनाली दिदी, कैलासगिरी महाराज, उत्तम महाराज गुंड यांचा समावेश असून, रविवार दि. 1 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. परिसरातील भाविकांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सप्ताह कमिटी, पोलीसमित्र समिती, दक्षिणमुखी हनुमान मंडळ व गोपाळपूर ग्रामस्थांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)